नगरमध्ये झारखंडच्या मोबाईल चोरांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

श्रीरामपुर येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरी करणाऱ्या झारखंड मधील आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावेळी 1,20,000 रुपये किंमतीच्या 16 मोबाईल हॅन्डसेट त्याच्याजवळून जप्त करण्यात आले आहेत. गोविंदकुमार ठाकुर, शुभमकुमार चन्नु महातो, तुफान रघु रियासन अशी त्यांची नावे आहेत.

हरीश विष्णु गर्जे या व्यक्तीचा व इतर ४ जणांचा असे एकुण 5 मोबाइल अज्ञात चोरट्याने चोरले होते. याबाबत श्रीरामपुर शहर पोस्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरून 296 /18, भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी गोविंदकुमार ठाकुर राय याने ही चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच या चोरीचा पर्दाफाश झाला.