
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून शासनाची फसवणूक करणाऱ्या देवळाली प्रवराच्या बंटी-बबलीला राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. संजय गांधी निराधार योजना व इतर दिव्यांगांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता
ताज निसार पठाण व रुबानी ताज पठाण अशी आरोपींचा नावं असून हे दोघे पती-पत्नी आहे. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवून घेऊन संजय गांधी निराधार योजना व इतर दिव्यांगांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेत शासनाची फसवणूक केली होती. याबाबत देवळाली प्रवराचे तत्कालीन तलाठी दीपक नामदेव साळवे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई करत पोलिसांनी ताज निसार पठाण व रुबानी ताज पठाण यांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरिक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव, गणेश लिपणे, राहुल यादव, शेषराव कुटे, वृषाली कुसळकर, अंजली गुरव, संतोष दरेकर यांनी सदरची कारवाई केली आहे.