
केरळमध्ये भाजप कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यकर्त्याने नगर पालिकेच्या कार्यालयावर जय श्री राम, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे पोस्टर लावले होते. या विरोधात पोलिसांनी कारवाई केली होती.
Keral me bjp @KreatelyMedia @BJP4Keralam @beingarun28 @KapilMishra_IND @mkrtiwari_bjp @BJP4India @drdineshbjp @NareshVijayBJP @BJP4India @BJP4Delhi pic.twitter.com/Fc8tyryXoj
— JEETU DEWASI (@JEETUDEWASI0) December 17, 2020
17 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजपला यश मिळाले. तेव्हा भाजप कार्यकर्त्याने पलक्कड नगर पालिकेच्या कार्यालयावर जय श्री राम, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे पोस्टर लावले होते. यावर काँग्रेस नेते आणि कम्युनिस्ट नेत्यांनी नाराजी दर्शवत पोलिसांत तक्रार केली. तेव्हा पोलिसांनी कारवाई करत या कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या निवडणुकीत भाजपला 52 पैकी 28 जागांवर यश मिळाले होते.





























































