कोतवाली पोलिसांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, दोघांना घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तलवार, कोयते, गुप्ती बाळगल्या प्रकरणी दोन आरोपींना कोतवाली पोलीसांच्या ताब्यात घेऊन त्यांच्या कपड्यातून शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कुणालसिंग कमल सिंग जुन्नी (19) रा काटवनखंडोबा, अर्शद रशिद शेख वय-(22) रा. इमामवाडा, नविन टिळकरोड दोघे राहणार नगर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 22 रोजी कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नगर शहरातील काटवन खंडोबा कमानीचे जवळ टिळकरोड लगत इसमनामे कुणालसिंग कमल सिंग जुन्नी हा हत्यारे बेकायदेशीरपणे बाळगून विक्री करत आहे. आत्ता गेल्यास त्याला पकडता येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांना सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यावेळी आरोपीला पकडुन त्याची चौकशी केली असता, त्याचे नाव कुणालसिंग कमल सिंग जुन्नी (19) रा काटवनखंडोबा नगर असे सांगुन त्याच्याकडे दोन तलवारी, एक कोयता, एक सत्तुर अशी हत्यारे सापडली आहेत. त्याच्याकडे सापडलेली हत्यारे कुठून आणि कोणत्या कामासाठी आणलेले आहेत यादिशेने त्याची विचारपुस केली असता ही हत्यारे माझीच असून त्यापैकी एक मोठा कोयता व एक चाकु हा अर्शद रशिद शेख वय- 22 वर्षे रा. इमामवाडा, नविन टिळकरोड नगर याची असल्याचे कबुल केले आहे. सदर कारवाईबाबत पोलीस नामदार सलीम शेख यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोना महेश बोरुडे हे करत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि रविंद्र पिंगळे, पोलीस अंमलदार सतिष भांड, दिपक बोरुडे, योगेश भिंगारदिवे, सलीम शेख, रियाज इनामदार, अभय कदम, अतुल काजळे, सुजय हिवाले, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, शरद धायगुडे, कावेरी फुगारे यांच्या पथकाने केली आहे.