लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव शहरातील एका व्यक्तीने लग्न झालेले असतानाही दुकानात नोकरीला असणाऱ्या 34 वर्षीय विवाहितेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर गेल्या पाच महिन्यापासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. प्रविण सोपान भुजाडे असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात कोपरगाव शहर पोलिसांनी बलात्काराचा लुबाडणूक व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ही घटना कुलस्वामीनी टेक्सटाईल्स दिप्ती टॉवर्स कोपरगांव या ठिकाणी घडली आहे

पीडित विवाहिता 2019 मध्ये प्रवीण यांच्या दुकानांमध्ये नोकरीस लागली. त्यानंतर प्रवीणने आपल्याशी गोड बोलुन मी तुझेशी लग्न करतो, असे म्हणुन फसवुन सुरत येथे लॉजवर व निवारा कोपरगांव या ठिकाणी फिर्यादीशी बळजबरीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर कोपरगांव आयडीबीआय बॅकेत फिर्यादीचे अकाऊंट उघडुन चेक बुकवर फिर्यादीच्या सहया घेवुन चेक बुक स्वता:कडे ठेवुन घेतले. फिर्यादीचे पॅनकार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, गॅस कार्ड बॅक पासबुक असे मुळ कागदपत्र स्वता:कडे ठेवुन घेतले. फिर्यादीचे 8 तोळे वजनाचे सोन्याचे दागीने बॅकेत ठेवतो, असे म्हणून घेऊन ते गहाण ठेवले. फिर्यादीकडून मुलाची फी भरण्यासाठी 27 हजार रुपये घेवुन प्रत्यक्षात 10 हजार रुपये फी भरुन बाकीचे पैसे स्वता:कडे ठेवले. प्रवीण याने आपले पहिले लग्नाबद्दल लपून ठेवले होते. मला कळले तेव्हा प्रवीणला त्याचे लग्नाबाबत विचारणा करता त्याने आपल्याला मारहाण करुन हाकलून दिले.यानंतर महिलेने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.