केरळसाठी नगर शिवसेनेकडून मदत फेरी, नागरिकांना मदतीचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nagar-shivsena-help-for-kerala

सामना प्रतिनिधी । नगर

केरळ येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचं चित्र आता स्पष्ट दिसू लागले असून तिथे मोठ्याप्रमाणावर मदतीची गरज आहे. अशा मदतीचा ओघ सर्वस्तरातून सुरू झाला असतानाच नगर शहर शिवसेना तेथील जनतेच्या मदतीसाठी निधी उभारणार आहे. शिवसेनेच्या 20 नगरसेवकांनी एका महिन्याचे मानधन देणार असल्याची घोषणा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

तसेच शहरांमध्ये तसेच गुरुवारी मदत फेरीचेही आयोजन करण्यात आले. शिवसेनेच्यावतीने केरळ पूरग्रस्तांसाठी संकलित करण्यात येणारा मदतनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे, असे राठोड यांनी यावेळी सांगितले. केरळमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. संपूर्ण देश केरळच्या पाठीमागे उभा राहिला आहे. शिवसेनासुद्धा केरळमधील नागरिकांसाठी मदत उभी करणार आहे.

दरम्यान, शिवसेना कार्यालयांमध्ये मदत स्वीकारली जाणार असून त्यासाठी संपर्क क्रमांक 9822788388, 9960282341, 8007777771 देण्यात आले आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आवाहन करण्यात आले असून शिवसेना नगर पेजवर सुद्धा नागरिक संपर्क करू शकतात, असे सांगण्यात आले आहे.