नगर झेडपीची अनेक वाहने धूळखात पडून, प्रशासनाचे दुर्लक्ष

निवडणुका पुढे ढकलल्यामुळे सध्या जिल्हा परिषदेमध्ये ‘प्रशासक राज’ सुरू आहे. त्यामुळे अनेक वाहने धूळखात पडून आहेत. वाहने चालत नसल्यामुळे या वाहनांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, खराब होण्याच्या मार्गावर आहेत. वेळीच याकडे लक्ष न दिल्यास जिल्हा परिषदेचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रशासन या बाबींकडे गांभीर्याने पाहणार का, हा खरा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

नगर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेली वाहने प्रशासक असल्याने सध्या ही वाहने प्रशासनाच्या ताब्यामध्ये आहेत. जिल्हा परिषदेमध्ये सध्या ‘प्रशासक राज’ पाहायला मिळत आहे वास्तविक पाहाता, निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रशासनाच्या हातामध्ये हा कारभार केला आहे. निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यामुळे आज जिल्हा परिषदेमध्ये महत्त्वाची असलेल्या पदाधिकारी अधिकारी वापर करीत असलेली अनेक वाहने धूळखात पडून आहेत. या वाहनांवर धूळ साचलेली आहे. ही वाहने आहे त्याच परिस्थितीमध्ये लावल्यामुळे ती दुरुस्त आहेत का नादुरुस्त आहेत, हे काही कळू शकलेले नाही. त्यामुळे ही वाहने आजही एकाच जागेवर गेल्या काही महिन्यांपासून उभी आहेत. आता ती वाहने सुस्थितीमध्ये कशा पद्धतीने राहतील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जुनी वाहनेसुद्धा याच ठिकाणी पडून आहेत. या वाहनांबाबत धोरणात्मक निर्णय होऊन ती योग्य पद्धतीने कशी वापरता येतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.