
राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत नागपुरात तर विकृतीचा कळस गाठणारी घटना घडली आहे. एका 30 वर्षांच्या तरुणाने चक्क घोडीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून फडणवीसांच्या नागपुरात हे काय चाललेय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरातील घोडेस्वारी अकादमीमध्ये ही घटना घडली.
अकादमीतील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आली. छोटय़ा सुंदर खोब्रागडे असे या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. नागपुरातील खाणी परिसरात एक घोडेस्वारी अकादमी आहे. 17 मे रोजी रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षकाने अकादमीच्या आवारात संशयास्पद हालचाल करताना एक व्यक्ती पाहिली आणि संचालकांना याबाबत तत्काळ कळवले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका तरुणाने अकादमीमध्ये प्रवेश करून तिथल्या एका घोडीवर बलात्कार केल्याचे आढळून आले.
n नागपूर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या छोटय़ा सुंदर खोब्रागडे हा पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे.