लग्नसमारंभात डीजेसमोर नाचताना धक्का लागला, घरी जाताना तरुणाचा काटा काढला

1769

नागपुरात लग्नसमारंभात डीजे सुरू असताना डान्स करताना धक्का लागल्याने तरुणांच्या दोन गटात वाद झाला आणि या वादाचे पर्यवसन खुनात झाले. निखिल लोखंडे (29) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. कळमना हद्दीतील अमन लॉन जुना कामठी रोड येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील डोंगरे मैत्रिणीच्या लग्नासाठी कळमना हद्दीतील अमन लॉन जुना कामठी रोड येथे गेले होते. यावेळी डीजेच्या गाण्यावर डान्स करताना धक्का लागल्याने दोन गटांमध्ये वाद झाला. याचा राग मनात ठेऊन सात ते आठ जणांनी मिळून फिर्यादी आणि त्याचा मित्र निखील लोखंडे यांना मारहाण केली.

लग्न समारंभ संपल्यावर घरी जात असताना आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रावर धारधार शस्त्राने वार केला. यात सुनील डोंगरे जखमी झाला, तर निखील लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला. सुनील डोंगरे याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या