
सामना प्रतिनिधी। नागपूर
गडचिरोलीच्या कुरखेडा परिसरात नक्षलवाद्यांनी 1 मेला केलेल्या हल्ल्यात 15 जवानांना वीरमरण आले. मात्र आता नक्षलवाद्यांनी हा घातपात घडवण्यासाठी माहिती देणाऱया खबऱयाचे आभार मानल्याचा मजकूर रोडवर लिहिल्याने खळबळ उडाली आहे.
कुरखेडय़ापासून काही अंतरावर रस्त्याच्या मधोमध प्रफुलदादा तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे कुरखेडा बॉम्बस्फोट सक्सेस झाला असेच आम्हाला माहिती देत रहा. लाल सलाम असा मजकूर लिहिला आहे. दरम्यान रोडवर लिहिलेला हा मजकूर नक्षलवाद्यांनी लिहिला की कोणी खोडसाळपणा केला याचा शोध पोलीस घेत आहेत.




























































