
नागपूरच्या दाभा परिसरात तब्बल 51 फूट उंच गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. राज्यातील हा सर्वात उंच गणपती असल्याचा दावा आयोजकांनी केलाय. सात मूर्तिकारांनी सुमारे 45 दिवसांत बाप्पाची विशाल मूर्ती साकारली आहे. मूर्तीचा आकार खूप मोठा असल्याने जागेवरच ही मूर्ती साकारण्यात आली असून विसर्जनही जागेवरच केले जाणार आहे. या उंच गणरायाची चर्चा संपूर्ण विदर्भात होतेय. चितारओळीचे प्रसिद्ध मूर्तिकार विजय वानखेडे यांनी मूर्ती साकारली आहे. त्यासाठी भंडारा जिह्यातील आंधळगाव येथून माती आणण्यात आली. आंधळगावच्या मातीला विशेष मागणी असते.