नागराज मंजुळेची वेबसीरीजमध्ये धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माता- दिग्दर्शक नागराज मंजुळे वेबसीरीज विश्वात पदार्पण करणार आहेत. ‘मटका किंग’ असे त्यांच्या पहिल्या वेबसीरीजचे नाव आहे.

रॉय कपूर फिल्म निर्मित आणि नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘मटका किंग’ने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ‘मटका किंग’ रतन खत्रीच्या आयुष्यावर ही सीरीज असल्याचे समजते. यामध्ये 1960 ते 90 च्या दशकातील घटना पहावयास मिळतील. याविषयी नागराज मंजुळे म्हणाले, प्रेक्षकांसमोर एक वेगळी कथा घेऊन येण्यासाठी ओटीटी संधीची वाट पाहत होतो. या निर्मिती प्रक्रियेचा मी आनंद घेत आहे. तसाच आनंद प्रेक्षकांना ’मटका किंग’ वेबसीरीजच्या माध्यमातून मिळेल. निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर म्हणाले, नागराज मंजुळेंचा सैराट हा गेल्या दशकातील माझा सर्वात आवडता चित्रपट आहे. त्यांच्यासोबत नवीन प्रोजेक्ट करताना खूप आनंद होत आहे.