नळेगावच्या मुख्य रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नळेगाव

नळेगाव मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे पादचारी ,शाळकरी विद्यार्थी ,वाहनचालकांना, व्यावसायिक व्यापारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . लातूर आणि उदगीर यांच्या केंद्रस्थानी असलेले नळेगाव या गावात वाहनांची मोठी वर्दळ असते आणि या ठिकाणी फळ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे बसचालकांना व्यावसायिक ,व्यापाऱ्यांना ,लहान-थोरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बांधकाम विभागाच्या वतीने नळेगाव येथील अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावूनही अद्याप बांधकाम विभागाने कारवाई केली नाही. यामुळे अतिक्रमण धारक अतिक्रमण काढण्यास तयार नाहीत. संबंधित बांधकाम विभागाने पंधरा दिवसात अतिक्रमण काढण्याची नोटीस देऊनही अतिक्रमण निघत नसल्यामुळे,संबंधित प्रशासन कारवाई का करत नाही याची नळेगावात चर्चा सुरू आहे .

संबंधित अधिकार्‍यांना वेळोवेळी सूचना ,निवेदन करूनही काहीच फरक पडत नसल्यामुळे नागरिकांमध्य संताप व्यक्त केला जात आहे. तरी पोलीस प्रशासनाने व संबंधित बांधकाम विभागाने या रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे अशी मागणी मुख्य रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे.