राज्याला लस देण्यास केंद्राकडून टाळाटाळ – नाना पटोले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. कोरोनाचा सामना करताना केंद्र सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित आहे. पण केंद्र सरकार महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला.

देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानला लस पाठवत असल्याची टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्राला केंद्र सरकार लसींचा पुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहे. देशातही कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तान व इतर देशांना लस पाठवत असल्याचे नाना पटोले म्हणाले.