नाना शंकरशेट यांना अभिवादन; मुंबई, ठाण्यासह ठिकठिकाणी कार्यक्रम, शेकडो नानाप्रेमींची उपस्थिती

थोर समाजसुधारक, शिक्षण महर्षी, हिंदुस्थानी रेल्वेचे जनक आणि मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार जगन्नाथ नाना शंकरशेट यांच्या 160व्या पुण्यतिथीनिमित्त आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, जोगेश्वरी, बोरिवली, मालाड, वसई, विरारसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात नानांच्या तैलचित्राला उपायुक्त शंकरवार यांनी पुष्पहार अर्पण करून नानांना आदरांजली अर्पण केली.

नाना शंकरशेट यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी नाना चौक येथील त्यांच्या पुतळय़ाला शेकडो नानाप्रेमींच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एशियाटिक लायब्ररी, वडाळा स्मृती स्थळ या ठिकाणी नानांच्या छायाचित्रांना पुष्पार्पण करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. मुंबई सेंट्रल टर्मिनसला नानांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा केंद्र सरकारने यथोचित गौरव करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष, समाजश्रेष्ठाr डॉ. गजानन रत्नपारखी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर, उपाध्यक्ष दिनकर बायकेरीकर, खजिनदार चंद्रशेखर दाभोळकर, सूर्यकांत कल्याणकर, दैसपचे विश्वस्त डॉ. विवेक रायकर, साहित्यिक रवींद्र माहीमकर, दिलीप मालंडकर, डॉ. अनुराधा पोतदार, विजय पितळे, सुनील देवरुखकर, अश्विन उपाध्याय, अजित पितळे, शंकरशेट कुटुंबीय व असंख्य नानाप्रेमी उपस्थित होते.