
नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदार संघात शुक्रवारी 148 अर्ज दाखल झाले आहेत. राज्यातील हा सर्वात मोठा आकडा असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महायुतीचे बापूसाहेब गोरठेकर यांच्यात मुख्य लढत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यातील अनेकजण अपक्ष आहेत.वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी आईलवार यांना उमेदवारी दिली आहे. भोकरव्यतिरिक्त बाहेरचे उमेदवार ही जास्त आहेत.
एवढे उमेदवार निवडणुकीत उभे राहिले तर एका व्होटिंग मशीनवर 16 असा आकडा गृहीत धरले तर 9 मशीन लागतील. याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना विचारले असता त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत वाट पाहू या.अन्यथा या ठिकाणी 9 मशीन लागतील. अनेकजण उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतील. एकंदर राज्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज भरण्याची संख्या ही नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 7 ऑक्टोबर आहे.





























































