पूल ओलांडताना शेतकरी वाहून गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

सामना प्रतिनिधी। नांदेड

नांदेडमध्ये जोरदार पाऊस सुरू असून तालुक्यातील वडगाव (ज) गावाजवळ पूल पार करताना एक 62 वर्षीय शेतकरी वाहून गेल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलीस या शेतखर्याचा शोध घेत आहेत. मात्र पावसाचा जोर वाढल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. मारोती संग्राम बिरकुरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

हिमायतनगर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु असून, नदी,नाले भरुन वाहत आहेत. वडगाव (ज) येथील पुलाची अवस्था देखील वाईट असून या पुलावरुन पाणी वाहत असल्याने इतर गावांशी नागरिकांचा संपर्क तुटला आहे. बिरकुरे या पुलावरुन घरी जाण्यासाठी निघाले होते. पण अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते पाण्यात वाहून तो वाहून गेले. तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. मात्र अद्यापपर्यंत बिरकुरे यांचा शोध लागलेला नाही.

summary…-nanded-farmer-drawn-while-crossing-bridge