आम्ही खवय्ये : चिकन बिर्याणी आणि चायनीज खूप आवडते – नंदेश उमप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नंदेश उमप… गायनासोबतच त्यांना चिकन बिर्याणी आणि चायनीज खूप आवडते. जमके खाओ!

> ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – पूर्वी खाण्यासाठी जगायचो. आता जगण्यासाठी खायचंय, असं वाटतं

खायला काय आवडतं? – चिकन बिर्याणी, कोलंबी, पापलेट भुर्जी, मेथी, शेपूची भाजी आणि चपाती हे पदार्थ आवडीचे आहेत.

> खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? – तेलकट कमी केलंय. रात्री-अपरात्री खात नाही. सलाड जास्त खातो. पौष्टिक पदार्थ खाण्याकडे लक्ष देतो. फळं खायचं वाढवलंय.

> डाएट करता का? – डाएट करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा त्रास होऊ लागला. म्हणून थोडय़ा थोडय़ा वेळाने थोडं थोडं खातो. बाहेरचा पिझ्झा, बर्गर शक्यतो खात नाही.

> आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता? – आता पंधरा दिवसातून दोन-तीन वेळा होतं. तेही दौरा किंवा कार्यक्रम उशिरा संपला असेल तरच बाहेर खाणं होतं.

> कोणत्या हॉटेलमध्ये जाता? – ‘गझाली’, ‘तडका’ आणि इराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊन खायला आवडतं.

> कोणतं पेय आवडतं? – ताक पितो.

> प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं–पिणं कसं सांभाळता? – फार जेवत नाही. फक्त एक किंवा दोन पोळी खातो. भात खात नाही. खूप जड अन्नपदार्थ खात नाही. सलाड जास्त खातो.

> दौऱ्यानिमित्त आवडलेला पदार्थ? – अहमदनगरच्या पारनेरला एका मंदिरात मी मराठीच्या कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. तिथे वरण-भात, तूप, लिंबू असं सात्त्विक जेवण वाढलं होतं. त्यांनी वाढलेल्या भाजीत जराही जास्त तेल नव्हतं. ते सात्त्विक जेवण आजही मला आठवतय. त्यानंतर कोकणातली म्हसोळा गावात एकदा ‘चिकन बिर्याणी’ खाण्याचा योग आला. ती एवढी अप्रतिम होती, की विसरता येत नाही.

> स्ट्रीट फूड आवडतं का? – प्रचंड आवडते. चायनिज खूप खाल्लंय.

> घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? – मेथीची भाजी, फक्त वरण-भात, आंबट गोड डाळ भाताबरोबर खायला खूप आवडते. आळूवडय़ा, मेथीची भाजी हे पदार्थ अतिशय आवडीचे आहेत. पूर्वीच्या मानाने आता मांसाहार फारच कमी करतो.

> स्वतः बनवू शकता अशी डिश आणि त्याची रेसिपा?- मॅगी आणि अंडय़ाची भुर्जी उत्तम बनवतो. त्याव्यतिरिक्त मला काहीही बनवायला अजूनपर्यंत जमलंच नाही.