
बुलढाणा जिह्यातील नांदुरा शहरातील गांधी चौकातील आशिष नवगजे यांच्या मालकीची तीनमजली इमारत शनिवारी 4 जुलैला सायंकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान पत्त्यासारखी कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही इमारत 34 वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे.
नांदुरा शहरातील गांधी चौकात आशिष नावगोजे यांच्या मालकीची इमारत 34 वर्षीय इमारत शनिवारी दुपारी एका दिशेला कलली होती. इमारतीच्या खालच्या बाजूस किराणा दुकान होते. तर वरच्या मजल्यावर नवगजे यांचे आईवडील, पत्नी, मुलगी असे चार जणांचे पुटुंब राहत होते. इमारत क्षतीग्रस्त होण्याच्या अगोदरच इमारत व परिसर रिकामे करण्यात आले होते. दुपारपासून इमारतीजवळ पुणालाही जाण्यास मज्जाव करण्यात येत होता. सायंकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा मलबा शेजारच्या वस्तीत पडला आहे. घटनास्थळाची पाहणीसाठी तहसीलदार, ठाणेदारासह नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी तातडीने आले होते.


























































