
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी कोणतीही ठोस माहिती नसताना बेछूट आरोप करून तिची बदनामी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदारपुत्र नीतेश राणे या दोघांविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेसुद्धा राणे यांच्या आरोपांना सातत्याने दुजोरा देत असल्याने त्यांच्यावरही फौजदारी कारवाई करण्यात यावी असे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे तेसुद्धा अडचणीत आले आहेत. पोलिसांनी आपला अहवाल महिला आयोगाला दिला आहे.
n कोणतेही पुरावे नसताना नारायण राणे यांनी 19 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन खोटे आरोप केले होते. दिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे वक्तव्य राणे यांनी केले होते. ते आरोप चुकीचे असून तिच्यावर बलात्कार झाला नव्हता असे शवविच्छेदन अहवालातूनही स्पष्ट झाले आहे.
दिशाच्या आईचे पत्र…
दिशाची आणि कुटुंबीयांची बदनामी करणाऱयांकर तातडीने कारवाई केली जावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर तसेच दिशाच्या आईने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे केली होती. या बदनामीमुळे आम्हाला जगणे कठीण झाले असून आमच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास संबंधितांना जबाबदार धरले जाके असे दिशाच्या आईने त्या पत्रात नमूद केले होते. त्या पत्राची दखल घेऊन रूपाली चाकणकर यांनी याप्रकरणी मालवणी पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

































































