पायाभूत सुविधा क्षेत्रात तीन शिफ्टमध्ये काम करणे आवश्यक; नारायण मूर्तींच्या विधानाने वादला सुरूवात

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी तरूणांनी आठवड्यातून किमान 70 तास काम करायला हवे. या वादग्रस्त विधानानंतर आता सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी एका ऐवजी तीन शिफ्टमध्ये काम करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या टेक समिट 2023 मध्ये झेरोधाचे सह संस्थापक निखिल कामत यांच्यासोबत झालेल्या संभाषणादरम्यान केलेले हे विधान आहे. यावेळी बंगळुरूच्या पुढील 5 ते 10 वर्षांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या गरजांवर चर्चा करत असताना हे विधान केले.

बंगळुरूमध्ये ज्या ठिकाणी अधिक कंपन्या आहेत अशा ठिकाणांना प्राधान्य देत सिटी मेट्रो पूर्ण करून इतर भागांसोबत जोडण्यासाठी प्राथमिकता देण्याची गरज असल्याचे मूर्ती यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पायाभूत उद्योगांना एकाच शिफ्टऐवजी अधिक शिफ्ट ठेवण्याचे आवाहन केले आहे. प्रगती करायची असल्यास सकाळी 11 वाजता येऊन संध्याकाळी 5 वाजता घरी जाणे योग्य ठरणार नाही. महत्वाकांक्षी असलेल्या राष्ट्रांमधील लोक सहसा दोन शिफ्टमध्ये काम करतात. हिदुंस्थानातील उद्योजकांनी देखील असाच दृष्टीकोन ठेवल्यास चीनच्या विकासाला मागे टाकू शकेल, असे मूर्ती यांचे म्हणणे आहे.