
काहीही झाले तरी विदेशी वस्तू विकत घेणार नाही, अशी शपथ घ्या, तरच ऑपरेशन सिंदूर यशस्वी होईल, असा नवा फंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितला. घरात किती विदेशी वस्तू वापरतो, याची यादी तयार करा व त्या वस्तू वापरणे बंद करा, असे सांगतानाच व्यापाऱयांनी विदेशी माल विकू नये, असे मोदींनी बजावले.
– गणेशमूर्तीही विदेशातून येतात. त्या मूर्तीचे डोळे इतके लहान असतात की ते उघडतही नाहीत. होळीतही विदेशी रंगांचा वापर होतो. तो थांबवा.