
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आज देशभरात स्वच्छता दिवस साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र कचऱ्यापुढे हात टेकल्याचे समोर आले आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहीमेअंतर्गत स्वच्छता श्रमदानासाठी गेलेल्या मोदींचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मोदी झाडूने कचरा काढताना दिसत आहेत, मात्र झाडा झुडपात अडकलेला कचरा झाडूने निघतच नसल्याने अखेर मोदींनी तो कचरा हाताने उचलावा लागला.
#WATCH: Prime Minister Narendra Modi sweeps & cleans the premises of Baba Sahib Ambedkar Higher Secondary School in Delhi’s Paharganj as a part of #SwachhataHiSeva movement. pic.twitter.com/sqjN7zxGmg
— ANI (@ANI) September 15, 2018
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता ही सेवा’ या मोहीमेची घोषणा केली. या मोहीमेअंतर्गत मोदी हे पहाडगंज येथील बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळेत गेले होते. मोदी स्वत: हातात झाडू घेऊन या शाळेचा परिसर साफ करायला सुरुवात केली आहे.























































