‘हाऊडी, मोदी’वर पावसाचे सावट

अमेरिकेतील ह्युस्टन शहर हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. रविवारी 22 सप्टेंबरला रात्री 8.30 ते 11.30 (हिंदुस्थानी वेळेनुसार) एनआरजी स्टेडियममध्ये ‘हाऊडी, मोदी’ इव्हेंट पार पडणार आहे. या कार्यक्रमात मोदी सुमारे 50 हजार प्रेक्षकांना संबोधित करणार आहेत. मात्र या मेगा इव्हेंटरवर पावसाचे सावट आहे. ह्यूस्टनच्या दिशेने येणार सर्व मार्ग पाण्यात बुडाले आहेत.

आयोजनाविषयी बोलताना हर्ष शिंगला यांनी सांगितले, ‘दीड हजार स्वयंसेवकांची टीम एनआरजी स्टेडियमवर रात्रंदिवस काम करीत आहे. या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच अमेरिका सरकारमधीन अन्य अधिकारी, कॉग्रेस सदस्य आणि महापौर सामील होणार आहेत. हिंदुस्थान आणि अमेरिकेतील संस्कृती या कार्यक्रमातून पाहायला मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या