यवतमाळमध्ये मोदींच्या सभेचा मंडप कोसळला, चार कामगार जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी उभारण्यात येत असलेला मंडप कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार कामगार जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱयावर येणार आहेत. त्यांची जाहीर सभा होणार असून या सभेसाठी भारी गावात 45 एकर जागेवर मंडप उभारण्यात येत आहे. मात्र त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असतानाच पिलर जमिनीतून निखळला. त्यामुळे त्याचे खांब खाली व्रेनवर कोसळले. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.