काम सांगितल्यामुळे नऱ्हेत कंपनी मालकावर कोयत्याने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कंपनीतील कामगार इतरत्र फिरताना दिसल्यामुळे त्याला मालकाने काम करण्यास सांगितल्याचा राग आल्यामुळे त्याने साथीदारांच्या मदतीने तरूणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आहे.

ही घटना 4 जूनला रात्री नउच्या सुमारास नऱ्हेत घडली. याप्रकरणी रोहित चौगुले (वय 21) आणि तुषार चव्हाण (वय 21) यांना सिंहगड पोलिसांनी अटक केले आहे. संदीप नाईक (वय 43, रा. नऱ्हे ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप यांची नऱ्हेत कंपनी असून त्याठिकाणी रोहित चौगुले कामाला आहे. 4 जूनला रोहित इतरात्र फिरताना संदीपला दिसून आला.

त्यामुळे त्यांनी त्याला चहा आणि नाश्ता करून कंपनीने दिलेले काम करण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे रोहितने साथीदारांच्या मदतीने संदीपवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव तपास करीत आहेत.