Ratnagiri News – देवगडमध्ये नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी

देवगड येथे तारामुंबरी, मळई, देवगड समुद्रकिनारी भागात नारळीपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

देवगड बंदरावर तहसिलदार रमेश पवार, उद्योगपती नंदकुमार घाटे, पोलिस निरिक्षक भरत धुमाळ, कस्टम निरिक्षक एस्.व्ही.पेडणेकर, बंदर विभागाचे मुकूंद खुडे, सागर सुरक्षा रक्षक संतोष ठुकरूल, शिवराम निकम, बाळा कोळंबकर, संजय पराडकर, सतिश खानविलकर तसेच शासकीय अधिकारी, व्यापारी बांधव, नागरिक व मच्छिमार आदी उपस्थित होते.तहसिलदार रमेश पवार यांच्या हस्ते शासकीय पुजा करण्यात आली व त्यानंतर समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला.जामसंडे मळई खाडीकिनारीही बाल मंडळ संगीत मेळा मळईतर्फे सागराला नारळ अर्पण करून नारळीपौर्णिमा साजरी करण्यात आली.मळई खाडीमध्ये मच्छिमारी नौकांनाही पताकांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.

मळईतील ग्रामस्थ श्रीकांत मेस्त्री यांच्या हस्ते सपत्नीक नारळाची विधीवत पुजा करण्यात आली.त्यानंतर महाआरती,गाहाणे करून नौकांमधुन मळई ग्रामस्थ व मच्छिमारांनी सागराला नारळ अर्पण केला.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष सत्यवान मणचेकर,प्रदोष कोयंडे,जयप्रकाश कोयंडे, रूपेश मणचेकर, सचिन मुणगेकर, अजित कोयंडे, मोहन कोयंडे,सुरेश मणचेकर,अनिकेत कोयंडे, हेमंत मणचेकर, नासीर खान, सतिश कोयंडे, बाळकृष्ण राजम, बाळकृष्ण भाबल,सुनील कोयंडे,प्रभाकर कोयंडे,दिलीप कोयंडे, गुरूप्रसाद मेस्त्री,महेश पांचाळ,सुदाम कोयंडे, शिवराज कोयंडे आदी मळई ग्रामस्थ मच्छिमार व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

तारामुंबरी येथे सागराला सुवर्णश्रीफळ अर्पण करून नारळीपौर्णिमा साजरी करण्यात आली. तसेच सायंकाळी 5 वाजता तारामुंबरी विठ्ठलमंदीराकडून सुवर्णश्रीफळ व कलशासह भव्य मिरवणुक काढण्यात आली.