आणखी एखादी पृथ्वी असणे शक्य; नासाचा अहवाल

उडत्या तबकडय़ांच्या अभ्सासासाठी प्रगत उपग्रहांसह नवे वैज्ञानिक तंत्र आणि सुविधांची गरज आहे, असे ‘नासा’ने एका अहवालात म्हटले आहे. सनसनाटीपेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोनातून या घटनांकडे पाहिले जावे. अद्याप तरी परग्रहवासीयांचा पुरावा सापडला नसला तरी अब्जावधी ग्रहमालांमुळे आणखी एखादी पृथ्वी कुठेतरी असणे सहज शक्य आहे, असे ‘नासा’ प्रमुख बिल नेल्सन यांनी म्हटले आहे.