नासाचे इन्साईट लॅण्डर यान उलघडणार मंगळावरील वातावरणाचे रहस्य!

599

लाल रंगाच्या मंगल ग्रहाबद्दल पृथ्वीवासीयांना नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. मंगळावर वातावरण अथवा एलियन्सचे वास्तव्य असावे अशा चर्चाही नेहमी सुरू असतात. मंगळाच्या वातावरणाचे रहस्य उलघडण्यासाठी आता अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने थेट इन्साईटर लॅण्डर हे अवकाश यान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरवले आहे. या यानाला मिळालेली माहिती अतिशय रंजक आहे.

इन्साईटरच्या निरीक्षणानुसार मंगळाच्या वातावरणातील दाब पृथ्वीपेक्षा प्रचंड आहे. शिवाय तेथील तापमान सतत बदलत असते. कधी प्रचंड उष्णता तर कधी प्रचंड शीतलहरी असे मंगळावरील वातावरण आहे. मात्र, या लाल ग्रहावर वातावरण असावे असा अंदाज करायला जागा असल्याचे यानाला आढळलेल्या अतिशय कमी तीव्रतेच्या आवाजावरून स्पष्ट झाले आहे. या ग्रहावर सतत मोठी धुळीची वादळे येत असल्याचेही निरीक्षण अमेरिकन संशोधकांच्या अभ्यासातून उघड झाले आहे.

अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठाचे अभ्यासक दोन बानफिल्ड यांच्या निरीक्षणानुसार इन्साईटर लँडरच्या निरीक्षणानुसार मंगळावर वातावरण आहे, हे तेथील वादळे आणि गूढ कमी तीव्रतेच्या आवाजाने स्पष्ट होत आहे. मात्र, या ग्रहावर कधी प्रचंड उष्णता तर कधी प्रचंड गारठा असतो. पृथीवर गुरुत्वाकर्षणाने जसे पाण्याचे ढग तयार होऊन ते आकाशात जातात तसेच गुरुत्वाकर्षण मंगळावर असू शकते. मात्र, पृथ्वीच्या तुलनेत ते वेगळे आहे. मंगळाच्या सतत बदलत्या वातावरणाचे गूढ उकलण्यासाठी इन्साईटर प्रयत्शील आहे.

इन्साईटर यानाने आता मंगळावरील तापमान ,तेथे सतत जाणवणारे भूकंपाचे धक्के, सतत येणारी धुळीची वादळे ,हवेचा दाब आणि संशोधकांना जाणवलेल्या आवाजाचे रहस्य शोधणे सुरु केले आहे. या शोधांच्या अभ्यासानंतर मंगळ ग्रहाचे वातावरण मानवाच्या वास्तव्यासाठी अनुकूल ठरू शकेल का, तेथील वातावरणात कधीकाळी जीवसृष्टी होती का ?या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या