Video – पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची पोत हिसकावली

nashik-chain

नाशिकच्या सिडकोतील बुरकुले हॉलमागील परिसरात सोमवारी सकाळी पत्ता विचारण्याचा बहाणा करीत दुचाकीस्वार चोरट्यांनी घराच्या गेटजवळ उभ्या वृद्धेची पोत हिसकावली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

ओम कॉलनीत पूनम मनोहर दरेकर या सोमवारी सकाळी सवाअकराच्या सुमारास आपल्या रो-हाऊसबाहेरील पोर्चमधील झोक्यावर बसल्या होत्या. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना गेटजवळ बोलावले. त्यांची 17.5 ग्रॅम वजनाची, 50 हजारांची पोत हिसकावून पळ काढला. दरेकर यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.