शिवसेनेच्या प्रयत्नांना यश, नाशिक-दिल्ली विमानसेवा आजपासून सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

उद्या शुक्रवारी, १५ जूनपासून नाशिकजवळील ओझर विमानतळावरून आठवड्यातून तीन दिवस जेट एअरवेजची नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू होत आहे. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, यामुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळणार आहे.

नाशिकहून देशभरात प्रमुख शहरांमध्ये विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. शुक्रवारी ओझर विमानतळावरून दिल्लीसाठी दुपारी २.३५ वाजता विमानाचे उड्डाण होईल. दुपारी ४.२५ वाजता ते दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचेल. सोमवार, बुधवार, शुक्रवार असे आठवडय़ातून तीन दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेंतर्गत या सेवेचा लाभ मिळणारे नाशिक हे देशातील तिसरे शहर आहे. यापूर्वी अलाहाबाद, हुबळी या शहराला या योजनेचा लाभ मिळाला आहे.