नाशिक – बेपत्ता वृद्धेचा घराजवळ आढळला मृतदेह

499
file photo

 जेलरोडच्या धनराजनगर येथून दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह मंगळवारी सकाळी घराजवळच गोणीत बांधलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच आईबद्दल माहिती दिल्यास पन्नास हजारांचे बक्षीस देण्याबाबतचे पत्रक त्यांच्या मुलाने परिसरात लावलेले होते. मंदाकिनी वसंतराव पाटील (65) या 1 फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या. त्यांचा मुलगा संदीपयाचे केक शॉप आहे. आई बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. आईबद्दल कोणी माहिती दिल्यास त्यांना पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी पत्रकेही पाटील कुटुंबीयांनी या भागात लावलेली होती. त्यातच आज घराजवळील एका मोकळ्या भूखंडावर गोणीत बांधलेल्या स्थितीत मंदाकिनी यांचा मृतदेह आढळला, तो कुजलेल्या स्थितीत होता. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या