खडकीजवळ जीप दरीत कोसळली; भीषण अपघातात आठ मजूर ठार, नंदुरबार जिल्ह्यातील दुर्घटना

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळखडकी रस्त्यावर शनिवारी सकाळी 31 मजुरांना घेऊन जाणारी जीप 70 ते 80 फूट खोल दरीत कोसळलीया भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झालामृतांमध्ये लहानग्याचाही समावेश आहेसायंकाळपर्यंत जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू होतेमृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

सातपुडा पर्वतरांगांमधील तोरणमाळखडकी या अतिदुर्गम भागात सकाळी साडेअकरा वाजता ही दुर्घटना घडलीतोरणमाळचे 31 मजूर एका प्रवासी जीपने बाजारासाठी म्हसावदशहादा येथे निघाले होतेअचानक ही जीप 70 ते 80 फूट खोल दरीत कोसळलीयाबाबतची माहिती मिळताच म्हसावद पोलीस ठाण्याचे अधिकारीकर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरीतून जखमींना बाहेर काढण्यास सुरूवात झालीदुपारपर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नंदुरबार नियंत्रण कक्षाने दिलीयात एका लहान मुलाचाही समावेश आहेजखमींना उपचारासाठी म्हसावदशहादातोरणमाळ व खडकी येथील रुग्णालयांमध्ये हलविण्यात येत आहेहा अपघात इतका भीषण होता की जीपचे अक्षरशः तुकडे होवून दूरदूर फेकले गेलेहा भाग अतिदुर्गम असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या