कोरोनाबाधित गंभीर रुग्णांसाठी वरदान ठरणारी प्लाझ्मा थेरपी येत्या आठवडाभरात नाशिक जिल्हा रुग्णालयात सुरू होणार आहे. प्लाझ्मा विलगीकरणासाठी आवश्यक असलेले अफेरेसिस मशीन रुग्णालयात बसवण्यात आले असून, इंडियन कौान्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रुग्णांवर या पध्दतीने उपचार करणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक निखील सैंदाणे यांनी दिली.
राज्य शासनाने महाराष्ट्रातील अनेक वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपीच्या उपयुक्ततेबाबत चाचण्या घेतल्या. कोरोना रुग्णांसाठी ही उपचार पद्धती उपयुक्त असूने महत्त्वाच्या दहा शहरांमध्ये ही थेरपी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, 14 जुलै रोजी शासनाने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाला प्लाझ्मा विलगीकरणासाठी वापरण्यात येणारे अपेâरेसिस मशीन उपलब्ध करून दिले.
‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या मशीनच्या वापराबाबतच्या तांत्रिक परवानग्या, त्याबाबतचे अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाने अन्न व औषध विभागाकडे सादर केले, त्यामुळे लवकरच रुग्णालयात प्लाझ्मा विलगीकरणाचे काम सुरू होईल.
कोरोनामुक्त रुग्णाने प्लाझ्मा दान करण्याची इच्छा दर्शविल्यास मशिनद्वारे सेंट्रीफ्यूज पद्धतीने प्लाझ्मा व प्लेटलेट वेगळे केले जातात. त्यापूर्वी रक्त नमुने घेऊन रक्तगट, हिमोग्लोबिन, एचआयव्ही चाचण्या करून नंतर प्लाझ्मा रक्तगटनिहाय कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येतो.
कोवीड टेिंस्टग लॅबचे काम प्रगतीपथावर
कोरोना संशयित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत जिल्हा रुग्णालय आवारातच कोविड टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी इमारत बांधकाम सुरू आहे. लवकरच येथे तपासणी करणे शक्य होवून प्रलंबित अहवालांची संख्या कमी होण्यास मदत होईल.
























































