साईचरणी महिंद्राची थार कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे साईचरणी सोन्याचांदीच्या दागिन्यांबरोबरच रोख रकमेच्या देणगीतही मोठी वाढ झाली असली तरी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने आगळेवेगळे दान म्हणजे नुकतीच लाँच केलेली थार कार साईचरणी अर्पण केली आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा उद्योग समूहाच्यावतीने कंपनीचे सीईओ विजय नाकारा यांनी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे थार कारची चावी आणि गाडी सुपूर्द केली आहे. या गाडीची किंमत जवळपास साडे आठ लाखांच्या घरात आहे. याआधी महिंद्राने व्हायोजर, बोलेरो, स्कार्पिओ, पॅम्पर, लोगन, झायलो, मॅक्सिमो, युवराज (ट्रक्टर) अशा 14 गाडय़ा साई चरणी अर्पण केल्या आहेत. त्यामध्ये आता थारचाही समावेश झाला आहे.