महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना वकील, ब्राह्मण, सुवर्णकार संघटनांचा पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजपा, रिपाइं, रासप, शिवसंग्राम महायुतीचे शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना वकिल संघ, ब्राह्मण समाज, सुवर्णकार समाज यांच्या संघटनांसह सर्वस्तरातून पाठिंबा मिळत आहे. नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर-इगतपुरी, सिन्नर विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या प्रचारफेऱयांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सर्वत्र भगवेमय वातावरण आहे.

महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना नाशिक शहरासह सिन्नर, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध संघटनांचे पाठबळ मिळाले आहे. गावोगावी प्रचारफेऱया, सभा, मेळावे यांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. विविध संघटनांच्या पाठिंब्यामुळे गोडसे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

नाशिक जिल्हा वकील संघ, नाशिक डिस्ट्रीक्ट ऍडव्होकेट मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या सर्व पदाधिकारी व सभासदांशी गोडसे यांनी संवाद साधला. या दोन्हीही संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱयांनी गोडसे यांनाच विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रारंभी त्यांनी ज्येष्ठ वकिल दौलतराव घुमरे, का. का. घुगे यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी वकिल संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे, उपाध्यक्ष प्रकाश अहुजा, सचिव जालिंधर ताडगे, संजय गीते, तसेच ऍडव्होकेट मल्टिपर्पज सोसायटीचे अध्यक्ष पांडुरंग तिदमे, सचिव रमेश कुशारे, यतिन वाघ, श्याम बडोदे, अजित छल्लानी, राजाभाऊ ठाकरे, अभिजीत बगदे, सुनील दरगोडे, अनंतराव जगताप, प्रेरणा देशपांडे उपस्थित होते.

सुवर्णकार समाजानेही गोडसे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याप्रसंगी अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, विजय बिरारी, कृष्णा बागुल, कैलास वाघ, बापू ओझरकर आदी मान्यवर उपस्थित होते. मोठय़ा मताधिक्याने गोडसे यांना पुन्हा निवडून देवू, असा विश्वास ब्राह्मण समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. यावेळी मुकुंद कुलकर्णी, विलास कुलकर्णी, श्रीराम चंद्रात्रे, नंदकिशोर ठोंबरे आदींसह समाजातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.