
नाशिककर सध्या मस्त गारवा अनुभवत आहेत़ पहाटेच नाही तर संपूर्ण दिवसभर नाशिककरांना थंडीचा कडाका जाणवत आहे. अवघ्या पाच दिवसात नाशिक शहराचे किमान तापमान 17 वरून थेट 11. 1 अंश सेल्सिअसवर घसरले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये वातावरणातील गारवा चांगलाच वाढला आहे. त्याचबरोबर निफाडला शुक्रवारी 10. 6 तर शनिवारी 11. 1 तापमान नोंदवले गेले आहे. त्यामुळे नाशिक शहर आणि निफाडमध्ये थंडी जाणवू लागली आहे.
दिवाळीआधी नाशिक जिह्यात थंडीचा कडाका जाणवू लागला होता. निफाडजवळील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 12 नोव्हेंबरला या हंगामातील नीचांकी 8. 5, तर नाशिकला 10.4 इतके किमान तापमान नोंदवले गेले होते. त्यानंतर मात्र तापमानात चढ-उतार होत गेले.
गेल्या पाच दिवसांपासून पुन्हा तापमानात घट होत आहे. नाशिक शहरात एकाच दिवसात किमान तापमान 14 वरून 11. 1 अंशावर खाली आले आहे. रात्री-पहाटेसोबतच आता दिवसाही गारवा वाढला आहे. निफाडला काल किमान 10. 6, कमाल 29. 5, तर आज किमान 11. 1 आणि कमाल 28. 2 तापमानाची नोंद झाली.