‘बम् बम् भोले’च्या जयघोषाने दुमदुमले त्र्यंबकेश्वर

623

आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वरासह नाशिक व जिल्ह्यात ठिकठिकाणी महादेव मंदिरात शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्र्यंबकेश्वर येथे पन्नास हजारांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. हर हर महादेव, बम् बम् भोलेच्या जयघोषांनी ही तीर्थक्षेत्रे दुमदुमून गेली होती. नाशिक येथे पहाटेपासूनच पवित्र गोदावरी नदीवरील श्रीरामकुंडात स्नानासाठी भाविकांची गर्दी होती. तेथील श्री कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी रात्री उशीरापर्यंत भाविकांची रिघ होती. श्री बाणेश्वर, श्री मनकामेश्वर, गंगापूर येथील श्री सोमेश्वर मंदिरासह सर्वच महादेव मंदिरे गर्दीने फु लून गेली होती. सर्वतीर्थ टाकेद येथे मोठ्या संख्येने भाविक आले होते. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडात स्नानानंतर भाविकांनी ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. शहर, जिल्ह्यात ठिकठिकाणी साबुदाणा खिचडी, केळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या