
गेल्या चार दिवसांपासून सैन्य दलातील रिलेटिव्ह भरती प्रक्रिया उपनगर येथे सुरू आहे. मात्र, ही जनरल भरती असल्याचा मॅसेज व्हायरल झाल्याचा दावा तरूणांनी केला, यामुळेच येथे देशभरातून मोठी गर्दी उसळली होती.
या भरतीचे वेळापत्रक सैन्यदलाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहे. सैन्य दलातून निवृत्त झालेले, महाराष्ट्रातील विकलांग झालेल्या कर्मचार्यांच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ही जनरल भरती नाही. मात्र, ती जनरल भरती असल्याचा मॅसेज व्हायरल झाल्याचे सांगत राज्यासह परराज्यातील तरुणांनीही उपनगर परिसरात गर्दी केल्याची माहिती उपनगर पोलिसांनी दिली.



























































