फक्त 99 रुपयांत सिनेमा बघण्याची संधी

येत्या 13 ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ आहे. या दिवशी अवघ्या 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येईल.

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (एमएआय)ने जारी केलेल्या निवेदनानुसार पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोल्स, डिलाइट यांच्यासह देशभरातील चार हजारांहून अधिक चित्रपटगृहांनी ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ उत्सवात सहभागी होण्यास तयारी दर्शवली आहे. सर्व वयोगटांतील लोक एकत्र येऊन एका दिवसासाठी चित्रपटांचा आनंद घेऊ शकतील आणि बॉक्स ऑफिसवर धमाल करणाऱया चित्रपटांचा आनंद साजरा करू शकतील. या दिवशी ‘जवान’, ‘गदर 2’, ‘फुक्रे 3’ असे चित्रपट अवघ्या 99 रुपयांत पाहता येतील. पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोल्स, मिराज, सिटीप्राइड, मुक्ता ए 2, मुव्हीटाइम, वेव, एमटूके आणि डिलाइट या मल्टिप्लेक्स चेन यामध्ये सहभागी होतील.