नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीची कारवाई, एजेएल आणि यंग इंडियनची मालमत्ता जप्त

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने काँग्रेसशी संबंधित असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) आणि यंग इंडियन यांची मालमत्ता जप्त केली आहे. या मालमत्तेची एकूण किंमत 751.9 कोटी इतकी आहे. ईडीने समाज माध्यमावर या कारवाईची माहिती दिली आहे.

यंग इंडियन कंपनीचे 38 -38 टक्के शेअर्स राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडे आहेत. एजेएलने यंग इंडियन ही कंपनी ताब्यात घेऊन तिचा कार्यभार स्वीकारला होता. या व्यवहारात आर्थिक अफरातफर झाल्याचा ईडीचा आरोप आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांची चौकशीही करण्यात आली होती. त्याखेरीज मल्लिकार्जुन खरगे आणि पवन बन्सल या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनाही चौकशीला सामोरं जावं लागलं होतं.