इशान कुंभारला कांस्यपदक

चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत खारघरच्या ईशान कुंभारने किक लाईट इव्हेंट, 21 किलो वजनाखालील 7 ते 9 वर्षे वयोगटातील स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. त्याच्या या पदकविजेत्या कामगिरीबद्दल त्याच्यावर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव केला जातोय.