दिल्ली-आग्रा मार्गावर मालगाडीचे 12 डबे घसरले, रेल्वे वाहतूक ठप्प

मथुरा जिल्ह्यातील विरंदाबन रोड आणि अजई स्थानकांदरम्यान एका मालगाडीचे 12 डबे रुळावरून घसरल्याची घटना मंगळवारी रात्री 8 वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी आणि दुरुस्ती पथकांनी घटनास्थळावर धाव घेत मदतकार्य सुरू केले. मालगाडी घसरल्याने आग्रा, झाशी आणि मुंबईकडे जाणारी सर्व रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. मालगाडीचे डबे ट्रॅकवर उलटल्याने तिन्ही पूर्णपणे ब्लॉक झाले आहेत. सीपीआरओ एनसीआर शशिकांत त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन पीएमआरजी (राजीव गांधी थर्मल पॉवर प्लांट, खेडार, हिसार/बरवाला, हरियाणा) ची होती आणि कोळसा वाहून नेत होती.