गेल्या आठवड्यात कोलंबिया, येल आणि न्यूयॉर्क विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थासह संपूर्ण युनायटेड स्टेट्समधील कॅम्पस तीव्र निषेधांचे क्रेंद बनले आहे. (Students for Justice in Palestine and Jewish Voice for Peace) यांसारख्या विद्यार्थी गटांनी आयोजित केलेल्या निषेधांना प्रोत्साहन मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात आंदोलकांना पोलिस अटक करत आहेत. यामुळे विद्यापीठातील कामकाजांवर परिणाम झाला आहे.
कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या वरच्या मॅनहॅटन कॅम्पसमध्ये 100 हून अधिक पॅलेस्टिनी समर्थक निदर्शकांना अटक करण्यात आल्याने, निदर्शनांमध्ये लक्षणीयरित्या वाढली आहे. तेव्हापासून इतर शैक्षणिक संस्थामध्ये असंख्य अटक करण्यात आली आहे. अनेक निदर्शकांना अतिक्रमण व गैरवर्तनाच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. सोमवारी उशिरा 133 आंदोलकांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना न्यायालयाच्या समन्ससह सोडण्यात आले.
गाझामध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करत आयोजकांनी, या युद्धामध्ये होणाऱ्या नरसंहारापासून फायदा मिळवणाऱ्या व्यापारी कंपन्यांन पासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.