
दिल्ली विधानसभेत पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून सोमवारी ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली. धमकीचा मेल प्राप्त होताच सुरक्षा दल दिल्ली विधानसभेत धाव घेत तपासणी सुरू केली.
दिल्ली पोलीस, बॉम्ब निकामी करणारे पथक, श्वान पथक आणि अग्निशमन दलाची पथके विधानसभेच्या परिसरात तैनात करण्यात आली. विधानसभेच्या संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.




























































