लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपचे स्वबळावर सरकार स्थापन होत नसल्याने इतर पक्षांची मदत घेत एनडीएचे सरकार स्थापन होत आहे. नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी निश्चित झाल्यानंतर त्यांनी संबोधन देताना ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला. विरोधक सातत्याने ईव्हीएएमच्या विसार्हतेबाबत प्रश्न करत होते. या निकालांनी आता त्यांची बोलती बंद झाली आहे,. ईव्हीएम जिंवत आहे का, असा सवाल त्यांनी केला होता. त्याला आता काँग्रेस नेत्याने जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.
मोदी यांनी सवाल केला होती की. ईव्हीएम अजून जिवंत आहे का? विरोधकांनी देशातील लोकशाही आणि लोकशाही प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास कमी करण्याचे ठरवले होते. त्यांनी ईव्हीएमच्या विसार्हतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे डीके शिवकुमार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधक देशातील लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडवण्याचा प्रयत्न करत होते. ते सतत ईव्हीएमला शिव्या देत होते. मला वाटले होते की, निवडणुकीच्या निकालानंतर विरोधक ईव्हीएमची अंत्ययात्रा काढतील. मात्र निकालानंतर संध्याकाळपर्यंत त्यांचे तोंड बंद झाले होते. ईव्हीएमने त्यांना गप्प केले. हीच देशाच्या लोकशाहीची ताकद आहे. आता मला विश्वास आहे की पुढील 5 वर्ष कुणीही ईव्हीएमवर संशय घेणार नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते.
यावर डीके शिवकुमार म्हणाले की, आम्ही पुरावे गोळा करत असल्याचे म्हटले आहे. नक्कीच, आम्ही उत्तर देऊ. आम्ही बरेच पुरावे गोळा करण्याच्या प्रक्रियेत आहोत. आम्ही पुरावे गोळा करू आणि तुमच्याकडे परत येऊ…, असे प्रत्युत्तर डीके शिवकुमार यांनी दिलं आहे.