
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात भीषण आगीची घटना समोर आली आहे. नरेंद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नझीराबाद परिसरात दोन गोदामांना लागल्याने आगीत आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
आग विझवल्यानंतर गोदामांमध्ये सर्च ऑपरेशनदरम्यान आधी तीन मग पाच मृतदेह आढळले, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. मृतांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. अद्याप दहाहून अधिक लोक बेपत्ता आहेत. दोन्ही गोदामांमध्ये डेकोरेशन फर्म आणि मोमो चेनचे कामगार राहत होते, बरुईपूर पोलिस जिल्हा पोलिस अधीक्षक शुभेंदू कुमार यांनी सांगितले.



























































