केरळमध्ये मासेमारी बोटीला आग; सुदैवाने कामगार सुखरूप बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमध्ये मासेमारी करणाऱ्या बोटीला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झाले नाही. यार्डात नांगरलेल्या बोटीला आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

पाच कामगार बोट तोडण्याच्या कामात गुंतलेले असताना बोटीला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच पाचही कामगारांनी पाण्यात उडी मारल्याने ते सुखरूप बचावले. बोट तोडण्याच्या कामादरम्यान वापरल्या जाणाऱ्या वेल्डिंग आणि कटिंग मशीनमधून निघालेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.