भरधाव स्कॉर्पिओची रिक्षाला धडक, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू; 5 गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव स्कॉर्पिओने रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना ग्वाल्हेरमध्ये घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालकासह पाच जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास परशुराम चौकाच्या पुढील जैन मंदिराजवळ घडली.

एकाच कुटुंबातील 9 सदस्य शीतला माता मंदिरात दर्शन घेऊन रिक्षाने घरी परतत होते. यादरम्यान जैन मंदिराजवळ भरधाव वेगात येणाऱ्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की रिक्षा हवेत उडाली आणि कडुनिंबाच्या झाडावर आदळली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले.

शुभम उर्फ लाली (30), शगुन, इंद्रजित उर्फ पप्पू शाक्य (55), लीला (52) आणि प्रीती (60) अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये प्रीती (20), प्रियांश (5) आणि आरव (6), तसेच कुटुंबातील आणखी एका सदस्याचा समावेश आहे.