इंडिगोच्या गुवाहाटी-दिल्ली फ्लाईटला 3 तास उशीर

इंडिगोच्या फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गुवाहाटीहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईटला 3 तास उशीर झाला. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. गुरुवारी गुवाहाटीच्या गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी उड्डाण करणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईट 6ई930 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे या फ्लाईटचे उड्डाण थांबवण्यात आले.